रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या महोत्सवात कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झोंपाळ्यावरची गीता, या गीतेचे पुनर्प्रकाशन करण्यासाठी प्रयत्न करणारे अनिकेत कोनकर आणि पुस्तकाचे इंग्रजी रूपांतर करणारे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा गौरव झाला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या महोत्सवात कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झोंपाळ्यावरची गीता, या गीतेचे पुनर्प्रकाशन करण्यासाठी प्रयत्न करणारे अनिकेत कोनकर आणि पुस्तकाचे इंग्रजी रूपांतर करणारे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा गौरव झाला.
‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी झोंपाळ्यावरच्या गीतेचा केलेला समश्लोकी इंग्रजी अनुवाद गीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होत आहे.
रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.
आज (१४ डिसेंबर २०२१) मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि ज्ञान देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, असं मानलं जातं. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. झोंपाळ्यावरची गीता ही १०० वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.
खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून (२५ डिसेंबर २०२०) येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध करण्यात आले. आज (चैत्र अमावास्या – ११ मे २०२१) या अनुवादाचा समारोपाचा भाग प्रसिद्ध करत आहोत.
…..