सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे यांची अक्षरघराला भेट

तळेरे (ता. कणकवली) : निकेतचे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण निकेतला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उद्गार सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे यांनी काढले.

संदेशपत्रांमुळे तळेरे गावाला सांस्कृतिक चेहरा : कवी अजय कांडर

तळेरे (ता. कणकवली) : संदेश पत्रसंग्राहक म्हणून महाराष्ट्रात ख्याती मिळविलेल्या निकेत पावसकर यांच्यामुळे तळेरे गावाला स्वतंत्र सांस्कृतिक चेहरा प्राप्त झाला आहे,* असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले.

ईशाच्या जिद्दीच्या पंखांना आर्थिक पाठबळाची गरज

तळेरे (कणकवली) : दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या ईशा जयराम सावंतला मोलमजुरी करून शिकविणाऱ्या वडिलांचे पांग फेडण्यासाठी डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्याची आवश्यकता आहे.

तळेरे येथील विशाल कडणे दुसऱ्यांदा `भांडुप भूषण`

तळेरे (ता. कणकवली) : समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो. मूळच्या तळेरे (ता. कणकवली) येथील विशाल कडणे या उच्चविद्याविभूषित तरुणाने दुसऱ्यांदा भांडुप भूषणपुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे.

आता लतादीदींची अक्षरभेट हेच संचित

माझ्या पत्राला लतादीदींनी उत्तर दिले. साक्षात मला प्रभुकुंजवरून त्यांचे पत्र आले. ते पत्र म्हणजे या संग्रहासाठी बूस्टर डोस ठरला.

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन 

तळेरे (ता. कणकवली) : २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स (तळेरे) आणि मेधांश कॉम्प्युटर्स (कासार्डे) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.