सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन 

तळेरे (ता. कणकवली) : २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स (तळेरे) आणि मेधांश कॉम्प्युटर्स (कासार्डे) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. शालेय स्तरावरील तीन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत होईल. स्पर्धेत सहभागासाठी ए-फोर आकारातील कागदाच्या एका बाजूला पसायदान लिहायचे आहे. पाठीमागे स्पर्धकाचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, स्पर्धकाचा पत्ता, फोन नंबर इत्यादी माहिती लिहायची आहे. 

पसायदान लिहिण्यासाठी शाईचे पेन, बॉल पेन, जेल पेन वापरण्यास हरकत नाही. मात्र कट निब अथवा बोरूने लिहू नये. आपले स्पर्धेसाठीचे साहित्य ३० जानेवारीपर्यंत प्रज्ञांगण परिवार, महालक्ष्मी प्लाझा, स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या बाजूला, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे पाठवावेत. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 77198 58387 किंवा 9403 120156 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply