man in white crew neck t shirt holding stay at home sign

रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांच्या दुप्पट रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण करोनामुक्त झाले. आज १०३ नवे रुग्ण आढळले. आज २०६ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,०९७ झाली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार ४१६ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७९ हजार ७७३ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.६३ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६०७ पैकी ५३१ निगेटिव्ह, तर ७६ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३९६ पैकी ३६९ नमुने निगेटिव्ह, तर २७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ९६ हजार ९९८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,०९७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८१७, तर लक्षणे असलेले २८० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७५५ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३४२ जण आहेत. एकूण ३८ रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १३०, तर डीसीएचमध्ये १५० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ६२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात २ रुग्ण दाखल आहेत.

आज चिपळूण तालुक्यातील ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५०८ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ०.५८ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२७ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७७, चिपळूण ४८५, संगमेश्वर २२६, रत्नागिरी ८३३, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५०८).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात २६ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ९ सत्रे पार पडली. त्यात १३२ जणांनी लशीचा पहिला, तर ९५ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १०८ जणांचे लसीकरण २६ जानेवारीला झाले. याशिवाय १५ ते १८ वयोगटातील ३ जणांनी लशीचा पहिला डोस घेतला. १५ नागरिकांनी तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेतला. २६ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४६ हजार ५६० जणांचा पहिला, तर ८ लाख १३ हजार २२८ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply