dispenser with soap and corona word

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे शंभरच्या आत, ३४८ रुग्ण करोनामुक्त, दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ७४ रुग्ण आढळले, तर ३४८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. २८ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ७२ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या २ जणांसह एकूण ७४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९९१ रुग्णांपैकी २० रुग्ण ऑक्सिजनवर असून ८ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ५०१ रुग्ण बाधित आढळले, तर ५४ हजार २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४८७ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग ९, कणकवली ७, कुडाळ १५, मालवण ७, सावंतवाडी २५, वैभववाडी १, वेंगुर्ले ६, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ८८, दोडामार्ग ६७, कणकवली १०५, कुडाळ २२४, मालवण ८९, सावंतवाडी २००, वैभववाडी ५०, वेंगुर्ले १५०, जिल्ह्याबाहेरील १८.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी शिवाजीनगर (कणकवली) येथील ८१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू कोल्हापूरच्या डायमंड हॉस्पिटलमध्ये झाला. त्या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. बोर्डवे (ता. कणकवली) येथील ३४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात झाला. त्या रुग्णाला मूत्रपिंडाचा आजार होता. या दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४८८ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८२, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०४, कुडाळ – २४९, मालवण – २९३, सावंतवाडी – २१०, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply