चिपळूण तालुका पर्यटन चळवळीला उभारी देण्याचा निर्धार

चिपळूण : चिपळूण तालुका पर्यटन चळवळीला उभारी देण्याचा निर्धार चिपळूण येथील एका चर्चासत्रात करण्यात आला.

आता सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल : धीरज वाटेकर

चिपळूण : दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे यासाठी आपल्याला सर्वांना वृक्षरक्षक बनावे लागेल, असा कानमंत्र लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कवितेतून प्रकट झाली अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता

तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.

ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून ताकद : अरुण इंगवले

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून मला माझी ताकद वाटते, असे प्रतिपादन चिपळूण येथील कवी अरुण इंगवले यांनी केले.

कोकणातील बंद घरांच्या चाव्या स्त्रियांच्याच हाती : श्रद्धा कळंबटे

तळवडे (ता. राजापूर) : महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय समाज बदलणार नाही. पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, आधुनिक सावित्रीने शिक्षणाची दारे खुली केली. कोकणातील बंद दारांची समस्या सोडवण्याची शक्ती स्त्रियांच्या हाती आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी व्यक्त केले.

गावोगावी साहित्य संमेलने भरविणे आवश्यक – प्रकाश देशपांडे

तळवडे (ता. राजापूर) : गावोगावी भरणाऱ्या अशा संमेलनांमुळेच प्रांतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांना बळ मिळते. मराठी भाषेला समृद्ध करणार्‍या बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा ग्रामीण संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी केले.