शिर्डीतील पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्याचा सहभाग

चिपळूण : शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Continue reading

देवरूख निगुडवाडीतील ‘आराधने’ची आगळीवेगळी परंपरा

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूखजवळच्या निगुडवाडीत पूर्वीच्या काळी गावकरी एकत्र येऊन गावात कोणतीही रोगराई येऊ नये यासाठी ग्रामदेवतांकडे आराधना करीत, प्रार्थना करीत, विनंती करीत. ती आराधना पद्धत आजही सुरू असून, या आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल शांताराम गोरुले यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

Continue reading

केळशीचा रथोत्सव आणि पलित्यांचा नाच

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या केळशी गावात हनुमान जयंतीला होणारा श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव आणि गणेशोत्सवात माहेरवाशीण गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल-सनईच्या तालावर श्रीकालभैरवाच्या साक्षीने रंगणारा सामूहिक पलित्यांचा नाच हे दोन्ही प्रकार आगळेवेगळे आहेत. चिपळूणमधील लेखक, पत्रकार धीरज वाटेकर यांनी त्याबद्दल लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

Continue reading

शालेय अभ्यासक्रमात पावसाच्या दोलायमानतेचा विषय आवश्यक : डॉ. माधवराव चितळे

चिपळूण : शालेय अभ्यासक्रमातील भूगोल हा विषय पावसाच्या दोलायमानतेसारख्या विचाराशी जोडला जायला हवा. हे शिकवले न गेल्याने पाण्याच्या व्यवस्थापनाचे पुरेसे गांभीर्य आपल्याकडे रुजले नसल्याचे मत डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले.

Continue reading

‘१९४२ चिपळूण’मधून चिपळूणच्या इतिहासाची माहिती – आमदार शेखर निकम

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ऑगस्ट क्रांतिदिनी ‘१९४२ चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटात झाले.

Continue reading

धीरज वाटेकर यांची पर्यावरण जनजागृती कौतुकास्पद : शेखर निकम

चिपळूण : कोकणातील पर्यावरण चांगले असेल तर पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. धीरज वाटेकर यांच्याकडून त्यासाठी होणारी जनजागृती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.

Continue reading

1 2 3