मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार उद्ध्वस्त झाले आहेत. आता पुन्हा कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौ-यात कोकणाचे जे विदारक चित्र पाहिले, ते बदलायचे आहे, कोकणवासीयांना तात्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून आपण सारे मिळून कोकणाला पूर्वस्थितीत आणू, कोकणाला वैभवाचे दिवस पुन्हा आणू, असा ठाम विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी १६ जूनला व्यक्त केला.