रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याची निर्मिती १९६० साली झाली. त्यानंतर ६३ वर्षांनी तालुक्यात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर २०२३) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन मंडणगडमध्ये झाले.
