विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कार देऊन गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी (२८ नोव्हेंबर २०२१) राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आले. या वेळी पुण्यातील ‘आपलं घर’ या आश्रमाचे संस्थापक विजय फळणीकर सौ. साधना फळणीकर, अ. भा. कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष विजय आंबर्डेकर, सचिव गणेश गुर्जर, अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे व्यासपीठावर उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांपर्यंत महती पोहोचवून राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन

रत्नागिरी : शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत महती पोहोचवून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाने झाशीची राणी लक्ष्मीबाईंना जयंतीनिमित्ताने अभिवादन केले.

कॅप्टन सीमा कदम ‘एनसीसी’ ‘जीवन गौरव’च्या देशातील पहिल्या महिला मानकरी

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅप्टन डॉ. सीमा कदम यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘महासंचालक गौरव सन्मान’ येथील वार्षिक प्रशिक्षण शिबिरात प्रदान करण्यात आला. प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या त्या भारतातील प्रथम मानकरी ठरल्या आहेत.

डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना धन्वंतरी, तर अनघा प्रभुदेसाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजापूर : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० च्या दोन पुरस्कारांचे वितरण २४ ऑक्टोबर २०२१ रोजी राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात आले. या वेळी धन्वंतरी पुरस्कार डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना आणि आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. अनघा विश्वास प्रभुदेसाई यांना डॉ. अरुण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.