श्रुती सावंत, हर्ष नकाशे आणि सौ. ईश्वरी तेजम यांना स्वरसिंधुरत्न पुरस्कार

वालावल (ता. कुडाळ) : प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित गायन स्पर्धेत श्रुती सावंत, हर्ष नकाशे आणि सौ. ईश्वरी तेजम यांची स्वरसिंधुरत्न पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

‘मदर्स डे’निमित्त वालावलमध्ये ‘श्रीरंग’तर्फे होणार माय-लेकींच्या कौतुकाचा सोहळा

कुडाळ : राज्यातील अंध, दिव्यांग, अ‍ॅसिड हल्लाग्रस्तांसहित विविध वंचित घटकासोबत काम करणारी श्रीरंग फाउंडेशन ही संस्था ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा करणार आहे. हा कार्यक्रम १३ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानात होणार आहे.

स्वरसिंधुरत्न स्पर्धेला वालावलमध्ये सुरुवात

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेली सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आज (१३ मे २०२३) सकाळी सुरू झाली आहे.

मोगरे भराडेमधील लक्ष्मीनारायण मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सव

आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरापासून जवळच असलेल्या मोगरे भराडे नावाच्या गावात श्री लक्ष्मीनारायणाचे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सवाबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सुधीर परांजपे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

वालावलपुरी उभा मुरारी, वैकुंठीचा राया…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातलं म्हणजे वालावल हे निसर्गसंपन्न गाव ओळखलं जातं ते तिथल्या श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामुळे. या मंदिराबद्दलच्या काही दंतकथा, कथा, आख्यायिका, प्रथा-परंपरा याबद्दल आशीष पणशीकर यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.