साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ जुलैच्या अंकाचे संपादकीय

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ जुलैच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ जूनच्या अंकाचे संपादकीय
त्नागिरी : येत्या ११ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.
रत्नागिरी : करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधक संचारबंदीचा भाग म्हणून रत्नागिरी आणि चिपळूण शहरात केवळ अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीला मुभा देण्यात आली असून दुचाकी वाहनधारकांना आता हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (७ मे) तसे आदेश जारी केले आहेत.
रत्नागिरी : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज रात्रीपासून राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच (२२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून) ती लागू झाली असून संचारबंदी किती तारखेपर्यंत लागू राहणार आहे, याचा उल्लेख आदेशात करण्यात आलेला नाही. साथरोग प्रतिबंधक कायद्याचा अवलंब करण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.