केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक करणारे जसे आहेत, तसे त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. अलीकडेच त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावरून मोठी टीका होत आहे. गडकरी यांच्या या वक्तव्यामध्ये काहीही अयोग्य आणि चुकीचे नाही.
