रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २२ जुलै २०२५ रोजी एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे आज (१९ जून) भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.
दर वर्षीप्रमाणे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास येत्या २० जूनपासून सुरू होत आहे. यंदाचा ठेववृद्धी मास राष्ट्रप्रेमाला समर्पित असेल, अशी घोषणा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. जेवढे ठेवीदार संस्थेमध्ये ठेव गुंतवतील, त्या प्रत्येक ठेवीदारामागे संस्थेच्या वतीने २५० रुपये भारतीय सैन्याला निधी म्हणून प्रदान केले जाणार आहेत.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ कोटी ३२ लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) २८.७० टक्के असून, राज्यातील १५ हजार संस्थांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असेल. तसेच, सलग १७ वर्षे कर्जवसुलीचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर राखण्यातही संस्था यशस्वी झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आज (३१ मार्च) संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी ताळेबंद मांडण्याचा आपला पायंडा पतसंस्थेने यंदाही कायम राखला.