स्वामी स्वरूपानंद संस्थेची कर्जवसुली सलग १७ वर्षे ९९ टक्क्यांपेक्षा अधिक

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ कोटी ३२ लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) २८.७० टक्के असून, राज्यातील १५ हजार संस्थांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असेल. तसेच, सलग १७ वर्षे कर्जवसुलीचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर राखण्यातही संस्था यशस्वी झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आज (३१ मार्च) संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी ताळेबंद मांडण्याचा आपला पायंडा पतसंस्थेने यंदाही कायम राखला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे रविवारी भूमिपूजन

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन येत्या रविवारी २३ मार्च रोजी होणार आहे.

भारतरत्न वाजपेयींच्या नावाने रत्नागिरीत होणार असलेल्या सभागृहाचा आनंद – रवींद्र चव्हाण

रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या १९६ वर्षांच्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह होणार आहे. याचा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी मदतीचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या पुनर्बाँधणीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन अध्यक्ष अॅड. दीपक मनोहर पटवर्धन यांनी केले आहे.

‘तथास्तु’ मैफिलीने नगर वाचनालयाच्या जुन्या वास्तूला गुरुवारी निरोप

रत्नागिरी : ‘तथास्तु’ मैफिलीने गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाच्या जुन्या वास्तूला आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात येणार आहे.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेचा प्रारंभ

रत्नागिरी : मांगल्यमय सणासमारंभाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची दसरा दिवाळी ठेव योजना गुरुवारपासून (दि.३ ऑक्टोबर) सुरू होत आहे.