कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.
रत्नागिरी : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. कातळशिल्प असलेल्या गावांनी पुढाकार घेतल्यास कोकण समृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
रत्नागिरी : पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव येत्या २६ आणि २७ मार्च रोजी रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : पर्यटनाला चालना देण्याकरिता आयोजित कातळचित्र महोत्सवानिमित्ताने येत्या रविवारी (दि. २७ मार्च २०२२) सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय तसेच निसर्गयात्री संस्थेने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी : कोकणाचे वैशिष्ट्य आणि आगळावेगळा वारसा ठरलेल्या कातळशिल्पांचा महोत्सव भरविण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेच्या गेल्या काही वर्षांपासून कातळशिल्पांचा शोध आणि जतन करण्याच्या चळवळीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पाठिंबा मिळाल्यामुळे महोत्सवाला चालना मिळाली आहे.