थिबा पॅलेस ते देऊड कातळचित्र सायक्लोथॉन

रत्नागिरी : पर्यटनाला चालना देण्याकरिता आयोजित कातळचित्र महोत्सवानिमित्ताने येत्या रविवारी (दि. २७ मार्च २०२२) सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय तसेच निसर्गयात्री संस्थेने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

थिबा पॅलेस ते देऊड येथील कातळशिल्प अशी ३७ किमीची ही सायक्लोथॉन होणार आहे. पहिल्या ३ विजेत्यांना अनुक्रमे ५००० रुपये, ३००० रुपये आणि २००० रुपये अशी विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्व सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र, पदक देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी दिली.

यापूर्वी सुवर्णसूर्य फाउंडेशनने गतवर्षी हेदवी ते गणपतीपुळे अशी ७२ किमीची सायक्लोथॉन आयोजित केली होती. त्या अनुभवावर ही सायक्लोथॉन यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन मेहनत घेत आहे. सायकलपटूंना काही अडचण आल्यास वाहन व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, हायड्रेशन पॉइंट्ससह अनेक गोष्टींची मदत केली जाणार आहे. बक्षीस वितरण समारंभ थिबा पॅलेस येथे होणार आहे. स्पर्धेसाठी ८५० रुपये प्रवेशशुल्क आहे. यामधील काही रक्कम कातळशिल्पांच्या स्वच्छतेसाठी, संवर्धनासाठी वापरली जाणार आहे.

कोकणात आढळणाऱ्या इसवी सनपूर्व १२०० मधील कातळशिल्पांचा रत्नागिरीकरांसह पर्यटकांना परिचय व्हावा, यासाठी कातळ महोत्सव होत आहे. सेव्ह हेरिटेज बिल्ड फ्युचर ही या महोत्सवाची थीम आहे. याचाच एक भाग म्हणून सायक्लोथॉन आहे. रत्नागिरी शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी निवास, भोजनाची व्यवस्था केली आहे. २७ ला सकाळी ६ वाजता सायक्लोथॉनला सुरवात होईल. थिबा पॅलेस, मारुती मंदिर, करबुडे फाटामार्गे जाकादेवी व देऊड असे अंतर सायकलने पार करावयाचे आहे.

अधिक माहितीसाठी प्रसाद देवस्थळी (9699777121, 7350725600) यांच्याशी संपर्क साधावा.

सायक्लोथॉनच्या रजिस्ट्रेशनसाठी लिंक –

https://pages.razorpay.com/pl_J8CImcv1vtqfVU/view

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply