रत्नागिरी जिल्ह्यात शून्य, सिंधुदुर्गात करोनाचा एकमेव नवा रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत करोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. आज (२१ मार्च) रत्नागिरीत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर सिंधुदुर्गात एकमेव रुग्ण आढळला. दोन्ही जिल्ह्यांत एकही मृत्यू नोंदविला गेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ मार्च) करोनाची स्थिती सामान्य राहिली. आज एकही नवा रुग्ण आढळला नाही. चौघे रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ एकमेव सक्रिय रुग्ण आहे.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४६६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९३१ म्हणजे ९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले सर्व ७७ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व ६१ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ३३ हजार ५५५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेला एकमेव रुग्ण लक्षणे नसलेला आहे. त्यामुळे तो गृह विलगीकरणात आहे. संस्थात्मक विलगीकरणात एकही रुग्ण नाही. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये, सीसीसीमध्ये किंवा डीसीएचमध्येही एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २,५३४).

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (२१ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार २० जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी एकमेव रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५७ हजार ३७७ एवढी झाली आहे. आज ४ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५ हजार ८३८ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १० आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १,५२९ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply