सत्त्वश्री प्रकाशनाच्या `बीज अंकुरे अंकुरे`ला कोमसापचा पुरस्कार

रत्नागिरी : येथील कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसेच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या बीज अंकुरे अंकुरे या सुरेश ठाकूर संपादित पुस्तक्राला कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘शब्दांच्या पलीकडले’ अभिजाततेचा मागोवा घेणार – रामचंद्र आंगणे

आचरे (ता. मालवण) : सुरेश श्यामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्र्यांचे माजी स्वीय सहायक रामचंद्र आंगणे यांनी केले.

‘मूल्यसंस्कार’ पुस्तकामध्ये सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य – सुरेश ठाकूर

मसुरे (मालवण) : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकात एकविसाव्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी काढले.

लक्ष्मणराव आचरेकर यांना ज्येष्ठ सेवा पुरस्कार जाहीर

आचरे (मालवण) : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी संस्थेचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव आचरेकर यांना जाहीर झाला आहे.

कोमसाप मालवण शाखेतर्फे ‘भावलेले जयवंत दळवी’ उपक्रम

मालवण : सिद्धहस्त साहित्यिक आणि कोकण सुपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘भावलेले जयवंत दळवी’ या साहित्यिक उपक्रमाचे नियोजन केले आहे.

सुरेश ठाकूर यांना छात्र प्रबोधन मंडळाचा पुरस्कार प्रदान

आचरे (मालवण) : सावंतवाडीतील छात्र प्रबोधन मंडळाचा कै. वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार येथील निवृत्त शिक्षक सुरेश ठाकूर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.