अंकुरलेले साहित्यबीज

बीज अंकुरे अंकुरे नावाचे पुस्तक कोमसाप-मालवण शाखेच्या पुढाकाराने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ मालवण येथे झाला. मधुभाईंनी म्हटल्याप्रमाणे कोकणात साहित्याची बीजे ठिकठिकाणी आहेतच. तिला पूर्ण दिशा दाखविण्याचे काम कोणीतरी करायला हवे आहे. हे काम कोमसाप-मालवण शाखेचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर यांनी चांगल्या पद्धतीने निभावले आहे.

कोमसाप मालवण शाखेचा “बीज अंकुरे अंकुरे”चा उपक्रम अभिनव : कर्णिक

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा राष्ट्रीय अधिवेशनात गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषद आचरे उर्दू शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड

आचरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातल्या आचरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड झाली आहे.

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…; उर्दू शाळेतल्या प्रार्थनेने भारावले हवालदार

तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग खूप मोठा आहे असं नाही; पण आजच्या काळात सर्व प्रकारच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे द्वेषाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिसत असताना संवेदनशीलता जागृत असेल, तर जगाला प्रेम अर्पण करण्याच्या धर्माचा विसर पडणार नाही, याची जाणीव यातून होते, एवढं मात्र नक्की.

गझलकार मधुसूदन नानिवडेकरांच्या प्रथम स्मृतिदिनी आचऱ्यात ‘कोमसाप-मालवण’तर्फे ‘मधुरांजली’

आचरे : प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा पहिला स्मृतिदिन ११ जुलै २०२२ रोजी आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘मधुरांजली’ या साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी, १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम बागजामडूल-आचरे येथील जामडूल रिसॉर्टमध्ये होणार आहे.

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.