करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार

रत्नागिरी : करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २५ हजार ते दोन लाखापर्यंतचे सन्मान पुरस्कार रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. अशा तऱ्हेने पुरस्कार जाहीर करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.

कोविड-१९च्या अनिवार्य ट्रेनिंगसाठी आयुष डॉक्टर्सना अपुरी मुदत अन्याय्य

मुंबई येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या संस्थेकडून आयुष डॉक्टरांसाठी कोविड-१९ संदर्भातील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर्सनी ११ एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तशी कल्पना त्यांना केवळ दोन दिवस आधी देण्यात आली आहे. खेड्यापाड्यांत काम करणाऱ्या डॉक्टर्सना कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न भेडसावतो. त्यातच प्रशिक्षण न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महाइन्फोकरोना : सर्व प्रकारच्या एकत्रित माहितीसाठी राज्य सरकारची वेबसाइट

नागरिकांना करोनाच्या संदर्भातील सर्व प्रकारच्या सरकारी उपाययोजनांची अधिकृत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पुढाकार घेतला आहे. महासंचालनालयाने https://www.mahainfocorona.in या वेबसाइटची निर्मिती केली आहे. येथे मराठीत सर्व माहिती उपलब्ध आहे.

‘करोना’ची लक्षणे ओळखण्यासाठी सरकारचे ऑनलाइन स्वयंचाचणी टूल

करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची प्राथमिक लक्षणे नागरिकांना स्वतःच ओळखता यावीत, यासाठी महाराष्ट्र सरकारने सेल्फ असेसमेंट टूल (स्वयंचाचणी) विकसित केले आहे. हे टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. वैद्यकीय सल्ला हवा असेल, तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहेत. तसेच, यावर चाचणी केलेल्यांच्या लक्षणांच्या स्वरूपाची माहिती प्रशासनापर्यंतही आपोआप पोहोचवली जाणार आहे.

खासगी डॉक्टर्सनी सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश; प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.