‘मूल्यसंस्कार’ पुस्तकामध्ये सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य – सुरेश ठाकूर

मसुरे (मालवण) : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकात एकविसाव्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी काढले.

ऐका वैज्ञानिकांच्या कथा – शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम आजपासून सुरू करत आहोत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

‘कोमसाप’च्या मालवण शाखेने केली ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती

मालवण : पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. लेखन, संगीत, नाट्य अशा विविध क्षेत्रांत विपुल आणि दर्जेदार निर्मिती केलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या गौरवासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती केली आहे. पाच नोव्हेंबर अर्थात मराठी रंगभूमी दिनी या गीताच्या चित्रफितीचे उद्घाटन ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन सोहळ्यात झाले.

माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १५ (मसुरे भोगलेवाडीच्या जीवन शिक्षण विद्यालयातील मुंडले बाई)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १५वा लेख आहे गुरुनाथ ताम्हणकर यांचा… मसुरे भोगलेवाडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जीवन शिक्षण विद्यालयामधील शिक्षिका विभा विनायक मुंडले यांच्याविषयीचा…

आधुनिक काळातील भगीरथ : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

आज १५ सप्टेंबर, म्हणजेच ‘अभियंता दिवस.’ देशाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण सहभाग असलेले ख्यातनाम अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. देशाच्या विकास प्रक्रियेत देशातील अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गाव व शहरांच्या विकासासाठी रस्तेबांधणी, पूल उभारणी, जलसिंचन आदी क्षेत्रांत आपले कौशल्य दाखविणाऱ्या अभियंत्यांच्या सन्मानार्थ हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. सर विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्यातील काही प्रेरणादायी गोष्टी सांगणारा हा लेख… गुरुनाथ ताम्हणकर यांनी लिहिलेला…