मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम आजपासून सुरू करत आहोत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्याबद्दलच्या कथेपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. पहिल्या कथेची लिंक शेवटी दिली आहे.
या उपक्रमात कथामालेचे सदस्य विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वैज्ञानिकांच्या गोष्टी सांगणार आहेत. कोकण मीडियाच्या यू-ट्यूब चॅनेलवरून या कथा विद्यार्थ्यांना ऐकता येतील. तसंच ‘अँकर’वरून पॉडकास्ट स्वरूपातही या कथांचं प्रसारण केलं जाणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना, तसंच शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या कथा जरूर ऐकवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
यू-ट्यूबवर सबस्क्राइब करण्यासाठी https://www.youtube.com/kokanmediaratnagiri या लिंकवर क्लिक करा. अँकरवर सबस्क्राइब करण्यासाठी https://anchor.fm/kokanmedia या लिंकवर क्लिक करा.
या उपक्रमातील शास्त्रज्ञ आणि कथाकारांची माहिती
शास्त्रज्ञ : जयंत नारळीकर
कथाकार : गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
शास्त्रज्ञ : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
कथाकार : शिवराज विठ्ठल सावंत
शास्त्रज्ञ : ॲलन टुरिंग
कथाकार : सौ. रश्मी रामचंद्र आंगणे
शास्त्रज्ञ : अल्बर्ट आईनस्टाईन
कथाकार : सौ. उज्ज्वला चंरशेखर धानजी
शास्त्रज्ञ : आर्यभट्ट
कथाकार : सौ. अनघा अभिजित नेरुरकर
शास्त्रज्ञ : सी. व्ही. रमण
कथाकार : सदानंद मनोहर कांबळी
शास्त्रज्ञ : डॉ. पी. के. सेठी
कथाकार : सौ. स्वराशा सुनिला कासले
शास्त्रज्ञ : हेन्री फोर्ड
कथाकार : सौ. ऋतुजा राजेंद्र केळकर
शास्त्रज्ञ : मेरी क्युरी
कथाकार : कल्पना धाकू मलये
शास्त्रज्ञ : प्रफुल्लचंद्र राय
कथाकार : सुगंधा केदार गुरव
शास्त्रज्ञ : सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
कथाकार : गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
शास्त्रज्ञ : आल्फ्रेड नोबेल
कथाकार : दीपक भोगटे
शास्त्रज्ञ : जगदीशचंद्र बोस
कथाकार : सौ. शीतल नंदकुमार पोकळे
शास्त्रज्ञ : डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर
कथाकार : सौ. सुजाता सुनील टिकले
शास्त्रज्ञ : मायकल फॅरेडे
कथाकार : सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर
शास्त्रज्ञ : मीनल भोसले
कथाकार : सौ. सरिता पवार
शास्त्रज्ञ : श्रीनिवास रामानुजन
कथाकार : सौ. श्रद्धा सतीश वाळके
शास्त्रज्ञ : जोहान्स गटेनबर्ग
कथाकार : सुरेश शामराव ठाकूर

ऐका वैज्ञानिकांच्या कथा – डॉ. जयंत नारळीकर – साप्ताहिक कोकण मीडिया

