माय राजापूरतर्फे सोळा पोरक्या मुलांना मदतीचा हात

राजापूर : येथील माय राजापूर संस्थेने करोनामुळे राजापूर तालुक्यातील पितृछत्र हरपलेल्या सोळा मुलांना मदतीचा हात दिला, तर धारतळे कोविड सेंटरलाही वस्तुरूपाने मदत केली. संस्थेच्या सदस्यांनी पदरमोडीतून संकलित केलेल्या ८७ हजार रुपयांच्या निधीमधून ही मदत देण्यात आली.

करोनाने कर्ता पुरुष गमावलेल्यांच्या कुटुंबांना माय राजापूरची मदत

राजापूर : करोनाच्या काळात घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर झालेला मानसिक आणि आर्थिक काहीसा हलका करण्यासाठी माय राजापूर संस्थेतर्फे आर्थिक आणि वस्तुरूप मदत देण्यात आली.