जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरीत २१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; पंचतारांकित हॉटेलदेखील होणार

जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरीत २१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; पंचतारांकित हॉटेलदेखील होणार

जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यात २१५९ कोटी रुपयांच्या
गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात
भर घालणाऱ्या १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक
प्रकल्पांचा समावेश आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाजनजागृती मोहीम; ज्येष्ठांच्या खात्यांचा उतरवला जाणार सायबर विमा

सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाजनजागृती मोहीम; ज्येष्ठांच्या खात्यांचा उतरवला जाणार सायबर विमा

सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात
पुढच्या महिन्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम
राबवली जाणार आहे. बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांचा सायबर विमा
उतरवावा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

रानभाज्यांवर प्रक्रियेच्या दृष्टीने हवं संशोधन; व्यावसायिक उपयोगासाठी करावेत वेगळे प्रयोग : उदय सामंत

‘रानभाज्यांचे गुणधर्म लक्षात घेता, त्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत. त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्यासंदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं,’ अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प होणार नाहीत; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’

कॅन्सरप्रतिबंधक एचपीव्ही लसीकरणाचा महाराष्ट्रात सर्वप्रथम रत्नागिरीत प्रारंभ

ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरणाचा आज रत्नागिरीत प्रारंभ झाला. हे लसीकरण करणारा रत्नागिरी हा राज्यातला पहिला जिल्हा आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या वेळी सांगितलं.

रत्नागिरीतील नऊ गावे आदर्श म्हणून विकसित करणार : उदय सामंत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, महसूल सेवा पंधरवडा आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचं उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झालं.