रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या एकूण २७ प्रस्तावांमधून प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर लवकरच समारंभपूर्वक या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवड करण्यात आलेल्या शिक्षकांची यादी :
मंडणगड – जि. प. पू. प्राथमिक मराठी शाळा बामणघर – पदवीधर शिक्षक संजय करावडे
दापोली – जि. प. आदर्श प्राथमिक शाळा वाकवली नं. १ – उपशिक्षक जावेद शेख
खेड – जि. प. पू. प्राथमिक शाळा सवेणी नं. १ – पदवीधर शिक्षक एकनाथ पाटील
चिपळूण – पाग मुलांची शाळा – पदवीधर शिक्षक नरेश मोरे
गुहागर – जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा जानवळे नं. १ – उपशिक्षक चंद्रकांत बेलेकर
संगमेश्वर – जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा हातीव नं. १ – पदवीधर शिक्षक विनय होडे
रत्नागिरी – जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा भोके-आंबेकरवाडी – पदवीधर शिक्षक प्रदीप जाधव
लांजा – जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा वाकेड नं. १ – उपशिक्षक नितीन शेंडगे
राजापूर – जि. प. पू. प्राथमिक गोखले कन्या शाळा – पदवीधर शिक्षक सुहास काडगे
या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शैक्षणिक पात्रता, गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, जि. प. प्रज्ञाशोध परीक्षा, शैक्षणिक संशोधन, लेखन व व्याख्यान, नवभारत साक्षरता अभियान/मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानासाठी केलेले प्रयत्न, वृत्तपत्र अथवा प्रतिथयश नियतकालिकात प्रकाशित पाच लेख, नवोदय विद्यालय प्रवेश, शालेय कामांबाबत वरिष्ठांचे अभिप्राय, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, ग्रामीण भागातील सेवा कार्य, मागील पाच वर्षांत वर्गात शाळेत केलेली पटसंख्येतील वाढ असे निकष आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

