रुग्णवाहिकेला फोन गेल्यावर पाऊण तासात उपचार सुरू व्हायला हवेत : डॉ. उदय सामंत

मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर पेपरलेस कार्यप्रणाली राबवण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्याचा, सर्व विभागांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज बैठकीत केली.

बेघर निवारा केंद्रे उभारण्याची वेळ न येण्यासाठी आत्मचिंतनाची गरज; केंद्राच्या उद्घाटनावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा

रत्नागिरी नगर परिषदेच्या आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन आज (२१ जुलै) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवावी : डॉ. उदय सामंत

शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवली पाहिजे, असे विचार रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडले. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते.

शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे उदय सामंत यांचे निर्देश

बँकेचे शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करत असतील, तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (२८ जून) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

केबीबीएफच्या उद्योजकांनी दावोसमध्येही करार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनने (केबीबीएफ) आयोजित केलेल्या ग्लोबल मीटमध्ये आलेल्या उद्योजकांनी दावोस येथेही सामंजस्य करार करावा, असे उद्दिष्ट ठेवावे. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्लोबल मीटचा उद्देश साध्य होईल. तसेच ही ग्लोबल मीट मराठी उद्योजकांचे आयडॉल लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीदिनी म्हणजे २० जून रोजी मराठी उद्योजकता दिनी दरवर्षी आयोजित करावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.