रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘नाचणे क्र. एक’चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘नाचणे क्र. एक’चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले.
रत्नागिरी : नाचणे (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीने सलग चौथ्या वर्षी उन्हाळी छंद वर्ग (समर कॅम्प) आयोजित केला आहे. अशा तऱ्हेने छंद वर्ग आयोजित करणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेची पहिली मराठी शाळा आहे.
रत्नागिरी : कर्तबगार राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आजच्या मुलींनीही घेतला पाहिजे, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षिका आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले.
रत्नागिरी : महापराक्रमी झाशीच्या राणीचे चरित्र सर्व लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही मुलेच हा इतिहास वाचून इतिहास घडवू शकतील, असा विश्वास येथील विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी आज येथे व्यक्त केला.
रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे येथील ओम साई मित्र मंडळ हॉलमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती साजरी केली जाणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे ग्रामपंचायतीन जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन केले आहे. अशा तऱ्हेने मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करणारी नाचणे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.