रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन केले आहे. अशा तऱ्हेने मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करणारी नाचणे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
येत्या १४ आणि १५ मे या दोन दिवशी सकाळी ७.३०.ते ११.३० या वेळेत समर कॅम्प होणार आहे. योगासने, जादूचे प्रयोग, ओरिगामी, क्राफ्ट, मनोरंजक खेळ, पक्ष्यांचे आवाज, फेस पेंटिंग, आजी-आजोबांच्या गोष्टी, बोलके व्यासपीठ, बालगीते, बडबडगीते, रेकॉर्ड डान्स असे भरगच्च कार्यक्रम या शिबिरात होणार आहेत. रत्नागिरी आणि मुंबईतील नामवंत कलाकार मार्गदर्शक म्हणून शिबिराला येणार आहेत.
रत्नागिरी शहर आणि परिसरातील मुलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाचणे गावचे सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य शैलेश मालप, शुभम सावंत, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर यांनी केले आहे. शिबिरातील सहभागासाठी शैलेश मालप (९०२८१२३०३०), शुभम सावंत (९८३४७४७२७०), दीपक नागवेकर (९९२२७३५५००) किंवा अश्विनी पाटील (८८०६९०२५४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड