रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे येथील ओम साई मित्र मंडळ हॉलमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती साजरी केली जाणार आहे.
नाचणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्र. १ आणि कोट येथील रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि विधिज्ञ विलास पाटणे, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड, नाचणे गावाचे सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य शैलेश मालप, सदस्य शुभम सावंत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षक दीपक नागवेकर आणि सुभाष लाड यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

