रत्नागिरीच्या स्पृहा भावेला बालवैज्ञानिक सुवर्णपदक

रत्नागिरी : भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने सुवर्णपदक मिळविले. असे पदक मिळविणारी ती रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

फाटक हायस्कूलमध्ये सहावीत शिकणारी स्पृहा होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

फाटक हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिची डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत (२०२५-२६) प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

फाटक हायस्कूलच्या केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नीट, जेईई परीक्षांत विशेष यश!

‘एनटीए’मार्फत या वर्षी (२०२२) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. त्रि. प. केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील (द्वारा फाटक हायस्कूल) विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले आहे

‘शताब्दी वर्षात फाटक हायस्कूलने माजी विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करावे’

रत्नागिरीच्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ एक मार्च २०२१ रोजी झाला.

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेचे गुरुवर्य मा. न. जोशी स्कूल असे नामकरण

रत्नागिरी : फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, शिक्षक, उपमुख्याध्यापक आणि निवृत्तीनंतरही गुरुवर्य एमएन तथा माधव नरहर जोशी यांनी शाळेसाठी आयुष्यभर योगदान केले. गुरुवर्य फाटक यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी सुरू केलेले फाटक हायस्कूल शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. आता संस्थेने भारतीय संस्कृतीच्या विचारावर आधारित इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून, गुरुवर्य जोशी या योग्य व्यक्तीचे नाव शाळेला दिल्याचा विशेष आनंद वाटतो, असे प्रतिपादन दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर यांनी केले.