ग्रामीण साहित्य संमेलनाचा संस्मरणीय सोहळा

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेने दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या प्रारंभी वाटूळ (ता. राजापूर) येथे साजरे केले. त्याला दोन महिन्यांचा काळ लोटला असला, तरी त्याच्या स्मृती अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात जाग्या आहेत.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात ११ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव ७ एप्रिल २०२५ पासून सुरू झाला असून, ११ एप्रिल रोजी सकाळी या उत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव ७ एप्रिलपासून

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव येत्या सोमवारपासून (७ एप्रिल २०२५) सुरू होत असून, तो १२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा तेरावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा डोंबिवलीतील मंदार हळबे आणि कुटुंबीय करणार आहेत.

लांज्याच्या ‘स्थैर्य’ पुस्तकाला कोल्हापूरच्या ‘शिविम’ संस्थेचा पुरस्कार

रत्नागिरी : कोल्हापूर येथील ‘शिविम’ संस्थेचा ‘शिविम संकीर्ण साहित्य’ पुरस्कार लांजा येथील लेखिका डॉ. सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेल्या ‘स्थैर्य’ या पुस्तकाला मिळाला आहे.

खरेदी करताय? स्थानिक ठिकाणी की ऑनलाइन?

होळी, गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सर्व सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आजकाल सर्व तऱ्हेची ऑनलाइन खरेदी सोपी झाली आहे. स्थानिक ठिकाणी कोणतीही खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांचा घरपोच माल पोहोचविणाऱ्या ऑनलाइन खरेदीवर भर असतो. का केली जाते ऑनलाइन खरेदी? स्थानिक आणि ऑनलाइन खरेदीचे फायदे-तोटे काय, याविषयी लांज्यातील सुखानंद कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख…

कोकणातील चाकरमान्यांनी गावाकडे वळावे – सुभाष लाड

लांजा : कोकणातील चाकरमान्यांनी आता गावाकडे वळावे, असे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी हर्दखळे (ता. लांजा) येथे केले.