रत्नागिरी पालिकेवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजपा महायुतीने ३२ पैकी २९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

लांज्यात महायुतीला दोनतृतीयांश बहुमत

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने दोनतृतीयांश बहुमत मिळविले आहे. नगरसेवकपदाच्या एका जागेसह १८ जागा असलेल्या लांजा नगर पंचायतीत एकतृतीयांश म्हणजे ६ जागा अपक्षांनी मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सावली सुनील कुरूप यांची निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रभूषण शिल्पकार राम सुतार कालवश!

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे आज (१८ डिसेंबर २०२५) नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वांत उंच पुतळ्यासह अनेक महापुरुषांचे पुतळे त्यांनी साकारले होते.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात होतेय भक्तनिवासाची उभारणी; सुमंतबुवांच्या हस्ते भूमिपूजन

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातर्फे मंदिराच्या शेजारी भक्तनिवासाची उभारणी केली जात आहे. आठ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांच्या हस्ते या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.

पुनसचे सुपुत्र ॲड. सूरज मोरे झाले जिल्हा न्यायाधीश

रत्नागिरी : रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र ॲड. सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली आहे. रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या बारमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झालेले ते पहिलेच वकील आहेत.

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी यांची अपक्ष उमेदवारी

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.