अखेरच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सादर झाले ३९९ उमेदवारी अर्ज

रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज ९८ जणांनी सादर केली नामनिर्देशनपत्रं; महायुतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून भरले अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यात एकूण ९३ जणांनी सदस्यपदाकरिता, तर पाच जणांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले.

‘वस्त्रहरण’कार कालवश! गंगाराम गवाणकर यांचे निधन

मालवणी भाषा ज्यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकामुळे सातासमुद्रापार गेली, ते ख्यातनाम नाटककार गंगाराम गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

चांदणे इथले संपत नाही …

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे सर्वांत श्रीमंत पौर्णिमा. या पौर्णिमेला ‘माणकेथारी पौर्णिमा’ असेही म्हणतात. म्हणजेच मोती तयार करणारी पौर्णिमा. चंद्राच्या पूर्ण तेजाच्या मोत्यांची श्रीमंती धरणीवर उधळणारी पौर्णिमा म्हणून श्रीमंत पौर्णिमा.

रत्नागिरीच्या चित्पावन ब्राह्मण संघाचा श्रावण कीर्तन सप्ताह यंदा सात ठिकाणी

गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे केले जात आहे. दर वर्षी मंडळाच्या सभागृहात होणारा कीर्तन सप्ताह यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे.

प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल लिहिल्यास इतिहासनिर्मिती होईल : प्रकाश देशपांडे

जिंदाल कंपनीचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव लिमये यांनी लिहिलेल्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२९ जून) झाले.