कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनससाठी आता ईमेल मोहीम

वसई : कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी येथे टर्मिनस होण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता हर घर ईमेल मोहीम हाती घेतली आहे.

सावंतवाडी टर्मिनसबाबत खासदार विनायक राऊत यांना निवेदन

सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्याबाबत व्हावे आणि महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी थांबा मिळावा, अशा आशयाचे निवेदन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष मिहिर मिलिंद मठकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना दिले.

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससाठी उग्र आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी : सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील कोकण रेल्वेच्या टर्मिनसचे काम पूर्ण झाले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी स्थानकप्रमुखांना दिला.

वसई-सावंतवाडी पॅसेंजरची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वसई : कोकण रेल्वेमार्गावर वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमच्या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.

मुंबई रेल्वे महाचर्चेत वसई सावंतवाडी पॅसेंजरचा आग्रह

मुंबई : येथे पार पडलेल्या रेल्वे महाचर्चेत वसई सावंतवाडी प्रवासी संघटनेने वसई सावंतवाडी पॅसेंजर गाडीच्या आपल्या जुन्या मागणीचा आग्रह धरला.

वसई-सावंतवाडी पॅसेंजरची खासदार विनायक राऊत यांचीही मागणी

वसई : अनेक वर्षांपासून मागणी होत असलेली वसई ते सावंतवाडी पॅसेंजर गाडी कोकण रेल्वेमार्गावर लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.