मुंबई : येथे पार पडलेल्या रेल्वे महाचर्चेत वसई सावंतवाडी प्रवासी संघटनेने वसई सावंतवाडी पॅसेंजर गाडीच्या आपल्या जुन्या मागणीचा आग्रह धरला.
मुंबईच्या रेल्वेवाहतुकीला १७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर, आरोग्यदायी प्रवासासाठी मुंबईतील सर्व प्रवासी संघटना आणि वाहतूक विशेषज्ञांचे विशेष चर्चासत्र दादर येथे पार पडले. त्यामध्ये वसई सावंतवाडी कोकण प्रवासी संघटनेच्या वतीने अध्यक्ष शांताराम शं. नाईक आणि सेक्रेटरी यशवंत जव्हार सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या संघटनेतर्फे मांडल्या गेलेल्या विविध मागण्यांचा पुनरुच्चार केला.
वसई-सावंतवाडी रेल्वे पॅसेंजर, वसई टर्मिनस, जूचंद्र पूल, विरार लोकल, डहाणू लोकल, विरार टर्मिनस आधुनिकीकरण, कोविड कालावधीत बंद केलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करणे, कोकणाकरिता शालेय सुटीच्या काळात सोडलेल्या जादा रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे, कोकण रेल्वे महामंडळाकडे कोकणासाठीच रेल्वे सोडून प्रत्येक तालुक्यात थांबे देऊन रेल्वे स्थानकांवरील सुविधा वाढविण्याची मागणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त डबा, अपंगांसाठी आसने वाढविणे अशा अनेक समस्यांकडे मान्यवरांचे लक्ष वेधले. भविष्यात सर्वांनी एकत्रित लढा उभारण्यास सहकार्य करण्याची सूचना करण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

