‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’चा ६००वा प्रयोग २३ एप्रिलला संगमेश्वरात

‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. समर्थ कृपा प्रॉडक्शननिर्मित या लोकनाट्याचा ६००वा प्रयोग २३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वरमधील गणेशआळी येथे रंगणार आहे.

लोकनाट्य, लोककलांमधूनच अभिनय क्षेत्राला धडे : ओंकार भोजने

रत्नागिरी : नमन, जाकडी या लोककला केवळ कोकणातच आढळतात.अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच थिएटर, म्युझिक, स्टोरीटेलिंगचे धडे लोकनाट्य किंवा लोककलांमधूनच मिळतात, अशी भावना कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध अभिनेते ओंकार भोजने यांनी व्यक्त केली.

‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’चे ५०० प्रयोग पूर्ण; नाट्यप्रेमींकडून कलाकारांचा सन्मान

रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक लोककलांचे अस्सल संगमेश्वरी बोलीत विनोदी ढंगाने सादरीकरण करून अवघ्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित लोकनाट्याने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला.

कोकणचा साज-संगमेश्वरी बाज : संगमेश्वरी बोलीसह कोकणी संस्कृतीचा डंका वाजवणारे लोकनाट्य

बोलीभाषांच्या अस्तित्वाबद्दल चिंतेचे सूर ऐकू येत असताना एखाद्या बोलीभाषेतील लोकनाट्याचे तब्बल ५०० प्रयोग होणे हा एक विक्रमच आहे. हे भाग्य कोकणातील संगमेश्वरी बोलीला लाभलं असून, ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे त्या विक्रमी लोकनाट्याचं नाव आहे. अस्सल स्थानिक कलाकृती संस्कृतिवाहक कशी ठरू शकते आणि बोलीभाषेच्या पुनरुज्जीवनालाही कसा हातभार लावू शकते, हे या लोकनाट्याच्या उदाहरणावरून दिसतं. २३ मार्च २०२५ रोजी अडूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) इथे या लोकनाट्याचा ५००वा प्रयोग होत आहे. त्या निमित्ताने…

वानर-माकडांच्या त्रासाविरोधात अविनाश काळे यांचे गुरुवारपासून उपोषण

रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे गुरुवारपासून (दि. ५ ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

पर्यटन परिषदेचे फलित

पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.