संगमेश्वरातील ४०० वर्षांचा इतिहास असलेली नवरात्रातील तुणतुणे परंपरा

कोकणात, खासकरून रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात नवरात्रौत्सवात नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. शहाजीराजांनी सुरू केलेली ही परंपरा सरवदे समाजाने गेली ४०० वर्षं निष्ठेनं जपली आहे. इथून पुढच्या काळात मात्र ती लुप्ततेच्या मार्गावर आहे. या परंपरेविषयी…

जन शिक्षण संस्थानच्या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जन शिक्षण संस्थानमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन संगमेश्वर तालुक्यात माभळे, संगमेश्वर आणि साखरपा येथे झाले.

संगमेश्वरच्या कलांगणची स्वरभास्कर-देवगंधर्व संगीत मैफल २० फेब्रुवारीला

संगमेश्वर : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि पंडित भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिशताब्दीचे औचित्य साधून येथील कलांगण परिवाराने येत्या रविवारी (दि. २० फेब्रुवारी) संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे.

देवरूख महाविद्यालयात भारतीय स्थलसेना दिवस साजरा

देवरूख : भारतीय स्थलसेना दिनाच्या औचित्याने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्धी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.

एकदाही निवडणूक न झालेल्या पांगरी ग्रामपंचायतीचा ३० डिसेंबरला सुवर्णमहोत्सव

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या पांगरी-घोडवली-चांदिवणे या ग्रुप ग्रामपंचायतीचे १९७१ मध्ये विभाजन झाले आणि स्वतंत्र पांगरी ग्रामपंचायत स्थापन झाली. या वर्षी या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. या पन्नास वर्षांत एकदाही निवडणूक न झालेली ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ख्याती आहे.

कलांगणच्या इंद्रायणी काठी मैफलीला रसिकांची दाद

संगमेश्वर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षानिमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील कलांगण परिवारातर्फे आयोजित केलेल्या इंद्रायणी काठी या सुरेल मैफलीला रसिकांची उत्तम दाद मिळाली.