छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे हे बाबासाहेब पुरंदरेंचे ईश्वरी कार्य : अॅड. विलास पाटणे

‘सतत वाचन, आनंदी-सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्याचे ईश्वरी कार्य केले. आयुष्यभर प्रवास करून दिलेल्या व्याख्यानांतून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. पुण्यातील आंबेगाव येथे २१ एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी, हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे. शिवचरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुमचे-आमचे सर्वांचे आहे. या कार्यातूनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहू या,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.

सुभाषित संग्रह संकलित करण्याचा संकल्प सोडून श्रीकांत वहाळकर यांना श्रद्धांजली

रत्नागिरी : संस्कृत शिक्षक कै. श्रीकांत वहाळकर यांनी संकलित केलेल्या सुभाषितांचा संग्रह प्रकाशित केला जाईल, असा संकल्प त्यांच्या श्रद्धांजली सभेत सोडण्यात आला.

कोकणविकासासाठी आवश्यक कामे केंद्राच्या माध्यमातून करणार; विनोद तावडेंची ग्वाही

रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे केंद्र सरकारच्या पातळीवरून केली जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी सात डिसेंबर रोजी रत्नागिरीत दिली.