रत्नागिरीत २३, सिंधुदुर्गात ५ नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ फेब्रुवारी) करोनाचे नवे २३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ रुग्ण आढळले. रत्नागिरीत २ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज एकही रुग्ण बरे होऊन घरी जाऊ शकला नाही.

रत्नागिरीत २३, सिंधुदुर्गात ७ नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ फेब्रुवारी) करोनाचे नवे २३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ६, तर सिंधुदुर्गात ४ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीच्या पाच पट रुग्ण सिंधुदुर्गात करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ फेब्रुवारी) करोनाचे नवे ८, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात त्याच्या पाच पट म्हणजे ३५ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच्या मृत्यूची नोंद झाली.

रत्नागिरीत ३०, सिंधुदुर्गात ४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ फेब्रुवारी) करोनाचे नवे ३० रुग्ण आढळले. त्यात खेड तालु्क्यातील एकाच गावातील एकाच वाडीतील २७ जणांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ नवे रुग्ण आढळले. रत्नागिरीत १९, तर सिंधुदुर्गात ३ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच्या मृत्यूची नोंद आज झाली.

रत्नागिरीत २, सिंधुदुर्गात १ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ फेब्रुवारी) करोनाचे नवे ६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ रुग्ण आढळले. रत्नागिरीत २ जण, तर सिंधुदुर्गात १ जण करोनामुक्त झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मृत्यू नोंदविला गेला नाही.

रत्नागिरीत ६, सिंधुदुर्गात ११ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ फेब्रुवारी) करोनाचे नवे ६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ३३ जण, तर सिंधुदुर्गात ११ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू नोंदविला गेला.