रत्नागिरीत ६, सिंधुदुर्गात ११ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ फेब्रुवारी) करोनाचे नवे ६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ३३ जण, तर सिंधुदुर्गात ११ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि खेडमधील प्रत्येकी २, चिपळूणमधील तर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार खेडमधील एक जण बाधित आढळला. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६९७ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी २२२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७४ हजार ९०० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६७ आहे. त्यातील सर्वाधिक १६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ३३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२५५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.४४ टक्के झाला आहे.

एका मृत्यूची नोंद आज झाली. दापोली तालुक्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू आज नोंदविला गेला. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या आता ३५६ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (१३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे करोनाबाधित आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३४७ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९८६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिडवणे (ता. कणकवली) येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू आज झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७२ आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply