रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ फेब्रुवारी) करोनाचे नवे ६, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ रुग्ण आढळले. रत्नागिरीत २ जण, तर सिंधुदुर्गात १ जण करोनामुक्त झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मृत्यू नोंदविला गेला नाही.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार चिपळूण आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार गुहागरमध्ये १, तर चिपळूणमध्ये ३ जण बाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९७०३ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७५ हजार ६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६६ आहे. त्यातील सर्वाधिक १७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज दोघे जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२५७ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.४० टक्के आहे. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५६ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६७ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (१४ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ११ करोनाबाधित आढळले, तर १ जण करोनामुक्त झाला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३५८ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९८७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७२ आहे.
Follow Kokan Media on Social Media

