खासगी डॉक्टर्सनी सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश; प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

रत्नागिरी : करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू मिळणाऱ्या दुकानात गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना त्या वस्तू घरपोच देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.

करोनाचे संकट : पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद LIVE

करोना विषाणूच्या संसर्गाने भीषण रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधत आहेत. भाषणाचा लाइव्ह व्हिडिओ

राज्यात बंदी आदेश लागू; अधिसूचनेतील नियम जाणून घ्या

कोविड-१९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्च २०२०पर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेतील नियम जाणून घ्या…

कलम १४४ : काय करावे, काय करू नये? रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

‘२२ मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ची प्रभावी अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

या कालावधीत काय करावे, काय करू नये, कोणत्या सेवा सुरू, कोणत्या सेवा बंद राहणार आहेत, याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती..

'करोना'शी लढा : मानसिक आरोग्य उत्तम कसे राखाल? : डॉ. आनंद नाडकर्णी यांचा व्हिडिओ

सध्या सर्वत्र फक्त ‘करोना’ आणि ‘करोना’ एवढंच ऐकू येतं आहे, तेच वाचायला मिळतं आहे, दिसतं आहे… त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात भीतीचं वातावरण आहे. शिवाय सगळे व्यवहार बंद असल्याने ‘पुढे काय होणार’ याचं टेन्शनही आहे; पण या परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देता मानसिक आरोग्य उत्तम राखण्याची गरज आहे. ते कसं राखायचं याचं मार्गदर्शन ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी एका छोट्या व्हिडिओतून केलं आहे. त्यांचे शब्द सध्याच्या कठीण परिस्थितीत प्रत्येकाच्या मनाला उभारी देतील आणि संकटातून बाहेर पडण्याची मानसिक शक्ती देतील. तो व्हिडिओ येथे देत आहोत.