एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन

दापोली : एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन करण्यात आले. जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान, सरस्वती विद्यामंदिर आणि दापोली एसटी आगाराचा हा संयुक्त उपक्रम गेले वर्षभर सुरू आहे.

गाव तेथे वणवामुक्त मंडळ स्थापन करण्याचा निर्धार

दापोली : जालगाव (ता. दापोली) येथील दोन दिवसीय पर्यावरणस्नेही सहविचार सभेत वणवामुक्तीचा निर्धार करण्यात आला. गाव तेथे वणवामुक्त मंडळ स्थापन करण्याबाबत मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.

कर्दे मराठी शाळा दापोली तालुक्यात प्रथम

दापोली : मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत कर्दे (ता. दापोली) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

चंद्रनगरची आरोही इस्रोच्या मुलूखगिरीवर

दापोली : दापोली तालुक्यातील चंद्रनगर या छोट्याशा गावातील आरोही मुलूख ही विद्यार्थिनी इस्रोच्या मुलूखगिरीवर रवाना झाली आहे.

आज गांधीजी आठवताना…

पनवेलमधील चित्रकार गणेश म्हात्रे यांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील सर जहांगीर आर्ट दालनात सुरू होत आहे. अवचित भेट झालेल्या या चित्रकाराचे कलाप्रेमीने रेखाटलेले व्यक्तिचित्र.

स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी दापोलीत १ ऑक्टोबरला सायकल फेरी

कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून चाकरमानी गावी पोहोचतात. त्यासाठी वेगवेगळ्या वाहनांची निवड केली जाते. दापोली सायकलिंग क्लबच्या चौघा सदस्यांनी सायकलची निवड केली. आंबवली गावातील सूरज भुवड आणि किरण भुवड, लाडघर येथील अजय मोरे आणि कोळथरे गावातील यश भुवड नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला असतात. तेथून ते गणेशोत्सवासाठी गावी पोहोचले. हा २५० किमीचा सायकल प्रवास यश आणि किरण या दोघांनी १६ सप्टेंबर २०२३ रोजी आणि अजय आणि सूरज यांनी १९ सप्टेंबर रोजी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग मुंबई अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरू झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला.

या सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पागोष्टी झाल्या. पर्यावरणपूरक गणपती उत्सवाचा संदेश घेऊन निघालेल्या या चौघांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे सर्व शीण काही क्षणातच नाहीसा झाला आणि आणखी स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे चौघेजण सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. ऑफिस आणि बाजारात जाण्यासाठी ते अनेक वेळा सायकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहिले आहे. अनेक वर्षांपासून ते आजारी पडलेले नाहीत. गणपती बाप्पाची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी सुखरूप झाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.