कर्दे मराठी शाळा दापोली तालुक्यात प्रथम

दापोली : मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत कर्दे (ता. दापोली) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्य शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत दापोली तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत सर्व शाळांचे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन करण्यात आले होते. या स्पर्धेत कर्दे शाळेने चमकदार कामगिरी केली.

ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर अतिशय चमकदार कामगिरी करीत आहे. शालेय इमारत व परिसर सजावट, आकर्षक व बोलकी इमारत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रज्ञाशोध स्पर्धांमध्ये शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याशिवाय पर्यावरण शिक्षण, आरोग्य, परिसर अभ्यास यांसह विविध शैक्षणिक उपक्रमांत या शाळेने सक्रिय सहभाग घेतला आहे. शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार मळगे, स्वप्नील परकाळे, सुशांत केळसकर, वैजन देवघरकर हे चारही शिक्षक शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी अविरत प्रयत्नशील असून या सर्वांच्या कामगिरीचे पालकांनी नेहमीच कौतुक केले आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासात येथील पालकांचा सहभागही महत्त्वपूर्ण असून येथील सर्व पालक शाळेस चांगले सहकार्य करीत आहेत.

या सर्व बाबींचा विचार करून या शाळेची दापोली तालुक्यातील प्रथम क्रमांकाची स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून निवड झाली आहे. आता या शाळेचे जिल्हास्तरावर मूल्यमापन होणार आहे.

कर्दे शाळेच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रुके, उपाध्यक्ष सुशील मळेकर, कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, ग्रामसेवक गोरख पवार, स्थानिक प्राधिकरण सदस्य अपर्णा रुके, शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र माने, आसूद केंद्राचे केंद्रप्रमुख गुलाबराव गावीत, दापोली शिक्षण प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, गटविकास अधिकारी सुनील खरात आदी अनेक मान्यवरांनी कर्दे शाळेचे अभिनंदन केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply