लांजा : रणरागिणी राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने शिपोशी (ता. लांजा) येथे येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाचे बिगूल वाजले आहेत.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) आणि शिपोशी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शिपोशी येथे १ मार्च ते ३ मार्च या काळात नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याचा औपचारिक प्रारंभ रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने कोट (ता. लांजा) या लक्ष्मीबाईच्या मूळ गावातून आज झाली. यावेळी राणी लक्ष्मीबाईचे वंशज राजू नेवाळकर, सरपंच निशिगंधा नेवाळकर, सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे, शिपोशीचे सरपंच हरेश जाधव, संघाध्यक्ष सुभाष लाड, दीपक नागवेकर, महेंद्र साळवी, प्रसिद्ध चित्रकार महेश करंबेळे, जयराज मांडवकर, प्रकाश हर्चेकर, मंगेश चव्हाण, संतोष जाधव, भार्गव घाग, शहानवाज सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.
कोट गावात क्रांतीज्योतीची सुरवात लक्ष्मीबाईच्या मूळ घराच्या चौथऱ्यावर मशाल प्रज्वलित करून करण्यात आली. तेथून क्रांतीज्योती लांजा शहरात दाखल झाली. तेथे ठिकठिकाणी क्रांतीज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या ठिकाणी क्रांतिज्योत दाखल झाल्यावर सुहासिनीनी औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. सामजिक कार्यकर्ते राजू जाधव, विजय हटकर, प्रकाश जाधव, मंगेश वाघाटे, राहुल वर्दे यांनी क्रांतीज्योतीचे स्वागत केले.
कोट येथे राणीच्या पराक्रमाला साजेसे स्मारक आणि तिचे जीवनकार्य सांगणारे संग्रहालय व्हावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मायमराठीच्या प्रचार-प्रसारासाठी आयोजिलेली ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची क्रांतीज्योत लांजा येथून वाटूळ तिठा, ओझर, येळवण, रायपाटण, तळवडे, पाचल, भांबेड, केळवली, सालपे मार्गे शिपोशी गावात दाखल होईल. तेथे न्या. वैजनाथ विष्णु आठल्ये विद्यामंदिराच्या प्रांगणात क्रांतिज्योती दाखल होऊन क्रांतिकारक जी. अण्णा आठल्ये स्मारकाजवळ क्रांतीज्योत मिरवणुकीचा समारोप होईल.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

