स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी दापोलीत १ ऑक्टोबरला सायकल फेरी

दापोली : स्वच्छता हीच सेवा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी दापोलीत रविवारी (दि. १ ऑक्टोबर) सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. अधिक स्वच्छ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ‘स्वच्छतेसाठी एक तास’ हा उपक्रम राबवत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब, संतोषभाई मेहता फाऊंडेशन आणि दापोलीतील ज्ञानदीप संस्थेतर्फे रविवारी दिवंगत संतोषभाई फुलचंद मेहता यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्ताने सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही फेरी आझाद मैदानातून सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ती केळस्कर नाका, एसटी आगार, पोलीस ठाणे, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, ज्ञानदीप शाळा अशा ५ किमी मार्गावर असेल. या फेरीत ज्ञानदीपच्या अध्यक्षा सरोज मेहता, नगराध्यक्षा ममता मोरे, तहसीलदार अर्चना बोंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच लायन्स क्लब, जेसीआय, रोटरी क्लब यांचे पदाधिकारीही सायकल चालवत सहभागी होणार आहेत. या सायकल फेरीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची गरज, त्याचे फायदे आणि महत्त्व पटवून देण्यात येईल. स्वच्छता, साफसफाई श्रमदान केले जाईल.

या फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६ किंवा ८३०८३६६३६६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक उपक्रम विनामूल्य राबवले जातात. त्याचाच एक भाग असलेल्या रविवारच्या उपक्रमात सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि तंदुरुस्त आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply