चंद्रनगरची आरोही इस्रोच्या मुलूखगिरीवर

दापोली : दापोली तालुक्यातील चंद्रनगर या छोट्याशा गावातील आरोही मुलूख ही विद्यार्थिनी इस्रोच्या मुलूखगिरीवर रवाना झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेने राबविलेल्या नासा-इस्रोला विद्यार्थ्यांची भेट या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत झालेल्या निवड चाचण्यांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याने दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतीतल पाचवीतील विद्यार्थिनी कु. आरोही महेश मुलूख हिची इस्रोच्या वारीसाठी निवड झाली आहे. आरोही इतर पात्र विद्यार्थ्यांसोबत इस्रोकडे रवाना झाली आहे. दापोली पंचायत समिती कार्यालयात एका शानदार कार्यक्रमात दापोली तालुक्यातून पात्र ठरलेल्या पाच विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

इस्रोच्या वारीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पाचवीत शिकणारी आरोही एकमेव विद्यार्थिनी असून इतर विद्यार्थी सहावी-सातवीतील आहेत. हे सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांसह इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेला भेट देणार असून आशिया खंडातील सर्व प्रमुख शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या विज्ञान संमेलनासही भेट देणार आहेत. विमानाने प्रवास करणारी आरोही ही चंद्रनगर गावातील पहिलीच मुलगी असून तिचे चंद्रनगर गावातील अनेकांनी कौतुक केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply