आचरे येथील केंद्रप्रमुख सुगंधा केदार गुरव सेवानिवृत्त; शिक्षकवर्गाकडून शुभेच्छा

आचरे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सुगंधा केदार गुरव ३६ वर्षांहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर ३१ मार्च २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने ‘केंद्र शाळा आचरे क्रमांक एक’ येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वर्गाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.

साने गुरुजी कथामालेतर्फे आचरा येथे कथाकथन महोत्सव

मालवण : बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथे मालवण तालुकास्तर कथाकथन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.

रापण : कोकण किनारपट्टीचे सांस्कृतिक लेणे

सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करून देणारा हा लेख… सुरेश ठाकूर यांच्या लेखणीतून…

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

साने गुरुजी कथामालेचा नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखेचा बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरे येथील यशराज प्रेरणा या युवा संघटनेला जाहीर झाला आहे.