रत्नागिरी : रत्नागिरीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज येथील पोलीस संचलन मैदानावर चौसष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजवंदन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज येथील पोलीस संचलन मैदानावर चौसष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजवंदन झाले.
यापुढची आंदोलने वाढत्या महागाईसारख्या पोकळ कारणांपेक्षा सीमेवर लढणाऱ्या लष्करातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर सर्वांचे पेन्शन बंद करण्याकरिता जनमत संघटित करण्यासाठी झाली पाहिजेत. त्यामुळे महागाई घटायला नक्कीच मदत होईल.
एकंदरीत राज्याचा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असलेल्या कोकणासाठी कोणताच निर्धार नाही. जिल्ह्यापुरता एखादा नवा कार्यक्रम पालकमंत्र्यांना देता आला नाही. चेहर्यावर उत्साहाचे उसने हसू आणून महाराष्ट्र दिनाचा एक उपचार एकदाचा पार पडला.
करोनाचा कालखंड संपल्यानंतर मास्क लावा, अंतर ठेवा, स्वच्छता ठेवा, या त्रिसूत्रीचा नेतेमंडळींचा जयघोष थांबला आहे. राज्यापुरते बोलायचे झाले, तर अधूनमधून केंद्र सरकारवर टीका, निधी मिळत नसल्याचा आरोप, केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारी सापत्नभावाची वागणूक असे मुद्दे ठासून सांगितले जातात. पण त्याला जयघोषाचे स्वरूप येत नाही. अशा वेळी एक नवाच जयघोष राज्यातल्या मंत्रिमंडळाने शोधून काढला आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही, हाच तो जयघोष.